‘पुष्पा असो किंवा फुसका लेकिन झुकेगा नही साला’; भाऊ कदमचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ
मुंबई | गेल्या काही वर्षांपासून झी टिव्हीवर दाखवला जाणारा चला हवा येऊ द्या, हा शो प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे. त्यातच आता दाक्षिणात्य चित्रपट पुष्पानं अनेकांना भुरळ पाडली आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्येही पुष्पा चित्रपटातील कलाकार अवतरल्याचं दिसलं.
पुष्पामधील डायलॉग ते अल्लू अर्जुनच्या चालण्याची पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमध्येही भाऊ कदम पुष्पा चित्रपटातील पुष्पराजची अॅक्टींग करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावरती चला हवा येऊ द्या मालिकेतील हा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रेक्षकांना या शोची आतुरता लागली आहे. पुष्पा चित्रपटामध्ये रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्ये श्रेया बुगडे श्रीवल्लीची भूमिका साकारत आहे. या शोमध्ये भाऊ कदम पुष्पाचे डायलॉग मराठमोळ्या अंदाजात बोलताना दिसत आहे. भाऊ कदम यांची एंट्रीही खुप मजेदार दाखवली आहे.
दरम्यान, भाऊ कदम यांचे पुष्पराज लुकमधील अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला हवा येऊ द्या या शोवेळी या प्रोमोमध्ये भाऊ कदम पुष्पराजप्रमाणे नाचतानांही दिसत आहे. या शोवेळी केतकी माटेगावकर, स्वप्नील जोशी, महेश मांजरेकर, इत्यादी उपस्थित आहेत.
पाहा व्हिडिओ-
थोडक्यात बातम्या-
Student Protest: ऐकलं नाही तर पुन्हा ताकद दाखवू, हिंदुस्थानी भाऊचा ठाकरे सरकारला इशारा
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
“मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू अन् काय देव पावलाय गं”; भाजप प्रवक्त्याचं सरकारवर टीकास्त्र
‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’; गिरीश बापटांच्या वक्तव्याची एकच चर्चा
ऑफलाईन परीक्षेवरून वाद पेटला, वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
Comments are closed.