बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुष्पा I Hate Beer’; पोलिसांची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

नवी दिल्ली | नवीन वर्ष (New Year) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. आता नवीन वर्ष म्हटल्यावर स्वागत तर जंगीच होणार. लोक याच्या तयारीलाही लागल्याचं पहायला मिळत आहे. 31st साठी पार्टीचं (31st Party) आयोजन करत आहेत. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी लावण्यात येणार असल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी निर्बंधही जारी केले आहेत.

नवीन वर्ष म्हटल्यावर लोक दारु पिणार नाहीत असं तर होणार नाही. त्यामुळे दारु पिऊन नियम मोडणाऱ्यांसाठी पोलीसांनी पहिलेच आवाहन केल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता पोलिसांची हटके पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

लोकांना दारू पिऊन गाडी चालवण्यापासून रोखण्यासाठी राजस्थान पोलिसांनी ट्विटरवर एक मोहीम जारी केली आहे. त्यांनी केलेली हटके पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ‘पुष्पा आय हेट टियर्स’मध्ये बदल करून ‘पुष्पा आय हेट बिअर्स’, असं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात दारू पिण्याचे नियम वेगवेगळे आहेत. काही राज्यांमध्ये दारू पिण्यावर  कडक निर्बंध आहेत, तर काही राज्यात सूट देण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्ये दारूवर भरमसाठ शुल्क आकारले जाते.

 

थोडक्यात बातम्या – 

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

“…तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवत आहे”, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत – चंद्रकांत पाटील

‘याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या, लग्न बिघ्न आहे का माझं?’; अजित पवार संतापले

“पंतप्रधान मोदी मास्क लावत नाही म्हणून लोकही मास्क लावत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More