85व्या वर्षी बाॅलीवुडमध्ये पदार्पण करणारी पुष्पा जोशी पहिलीच महिला

मुंबई | अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटाबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. 85 वर्षीय महिला पुष्पा जोशी ‘रेड’ चित्रपटातुन  बाॅलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. 85व्या वर्षी बाॅलीवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या त्या कदाचित पहिल्याच महिला ठरु शकतात.

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड’ चित्रपटात सौरभ शुक्लाच्या आईची व्यक्तिरेखा पुष्पा जोशी साकारत आहेत. वयाच्या 85 व्या वर्षी हे नवं आव्हान पेलण्याचं पुष्पा जोशींनी ठरवलं आहे.

या चित्रपटात अजय देवगण इन्कम टॅक्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 16 मार्चला ‘रेड’ प्रदर्शित होणार आहे.