बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुष्पाचा जलवा कायम! आता साड्यांमध्येही पहायला मिळणार ‘पुष्पा’ची क्रेझ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड सुरू असतात. अशातच ‘श्रावल्ली’ या गाण्याच्या हुक स्टेप्सचा ट्रेंड इंस्टाग्रामवर सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. पुष्पा चित्रपटाचे धमाकेदार संवाद, धमाल गाणी आणि त्याच्या हटके स्टाईलनं सोशल मीडियावर लोकांना वेड लावलं आहे.

दक्षिण भारतीय सिनेमासृष्टीतील स्टार अल्लू अर्जनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाची क्रेझ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात पहायला मिळत आहे. सुरतच्या प्रसिध्द कापड बाजारातही ‘पुष्पा’ ची क्रेझ पहायला मिळाली. व्यापारी ‘पुष्पा’चं प्रिंटसह साड्या विकत आहेत.

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता पुष्पा राज ( अल्लू अर्जुन ) आणि श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) यांची साडी चर्चेचा विषय बनला आहे. चरणपाल यांनी सुरूवातीला दोन साड्या आणल्या यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. लोकांमध्ये या साड्यांना खूप मागणी असल्याचा दावा केला जात आहे. त्याला देशाच्या विविध भागातून ऑर्डर मिळू लागल्या.

दरम्यान, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार या राज्यातील कापड व्यापऱ्याकडून ‘पुष्पा साडी’ च्या ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे आता पुष्पा साडीचंही वेड लागल्याचं पहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची मोठी घोषणा, म्हणाले…

“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मोदींच्या काळात ‘इतक्या’ कोटी रूपयांची बँक फसवणूक, राहुल गांधीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“युपी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More