देश

पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पेट्रोल पंपावर लावण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने केला आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे.

निवडणुकांपूर्वी पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा आणि जर फोटो लावण्यास नकार दिलात तर पेट्रोल पुरवठाच बंद करू अशी धमकी देण्यात आली आहे, असं भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेचे अध्यक्ष एसएस गोगी यांनी सांगीतलं आहे.

दरम्यान, देशभरातील पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांची खासगी माहितीही सरकारने मागवली असून यामध्ये त्या कर्मचाऱ्यांची जात, धर्म, आणि ते कुठल्या मतदार संघात येतात याबदद्ल विचारणा करण्यात आली आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेहरूंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र

-अटलजींचं निधन नक्की 16 आॅगस्टलाच झालं का?- संजय राऊतांचा सवाल

-मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष

-हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड

-शिवसेनेची गुंडगिरी; टीव्ही 9चे पत्रकार राहुल झोरींना मारहाणीचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या