विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात
सोलापूर | विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. विजापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे.
बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. तर एकाला गंभीर जखम झाल्याने या प्रवाशाचा जागीच मृत्यू (Death) झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
मंगळवेढ्याजवळ भाविकांच्या बसला हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचा अपघात नेमका कोणत्या स्थितीत झाला, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चालकाचा ताबा सुटल्याने बस पूर्णपणे पलटी झाली आहे.
या अपघातात 1 जण ठार तर 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.