Top News देश

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; ‘या’ खासदाराने केली मागणी

पाटणा | मुंबईमध्ये नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यामुळे शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. अशातच महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून सध्या तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा करण्याची मागणी  लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी केली आहे.

उत्तर भारतीयांना ज्या प्रकारे टार्गेट केलं जात आहे म्हणजे कंगणाने प्रश्न विचारले म्हणून तिचं कार्यालय तोडण्यात आलं आणि कार्टून फॉरवर्ड  केलं म्हणून माजी नौदलाच्या माजी अधिकाऱ्याल मारहाण केली. जर असंच काहीसं वातावरण राहिलं तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.

लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचंही पासवान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेथील राजकारणी सुशांतच्या प्रकरणावरून आणि कंगणाच्या शिवसेनेसोबत झालेल्या वादावरून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये, अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही”

कार्यालयातील 6 जणांना कोरोनाची लागण, छगन भुजबळ होम क्वारंटाईन

“शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे”

‘मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या