बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा ठप्प आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मनसेने वेळोवेळी केली होती. त्यानंतर आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बसला प्रचंड वेळ लागतो गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही, अशी टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. मला खात्री आहे आपण हे करू शकता, आमचा सीएम जगात भारी, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिलं होतं. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत निर्णय घेतला नाही. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला याआधी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More