Top News महाराष्ट्र मुंबई

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

मुंबई | वसईत मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. याप्रकरणावरून संदीप देशपांडे यांनी सरकार तसेच मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडलंय.

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असं आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे  यांनी पोलिसांना दिलंय.

पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी नेहमीच मनसे उभी राहत आली आहे, याची आठवण संदीप देशपांडेंनी करून दिलीय.

जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे. म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा, असंही देशपांडेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा

रोहित पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; केली ‘ही’ विनंती

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या