बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश

मॉस्को | रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश देऊन महिना उलटला आहे. युद्ध सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी युद्ध परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केल्याने संपूर्ण जगाचं टेंशन वाढलं आहे. (Russia-Ukraine War)

रशियाकडून (Russia) सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात युक्रेन (Ukraine) सैनिकांसह शेकडो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच हजारो युक्रेनी नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन सैन्याला मोठे आदेश दिले आहेत.

9 मे पर्यंत हे युद्ध संपले पाहिजेत असा आदेश रशियन सैन्याला देण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी केला आहे. रशिया लवकरच हे युद्द संपवण्याची शक्यता असल्याचं वृत्त कीव इंडिपेंडंटने प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, 9 मे हा दिवस रशियामधील नाझींचा जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे 9 मे रोजी रशिया युद्ध संपवू शकते, असा दावा आता केला जात आहे. तर रशिया युक्रेन नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असून त्यांना ओलीस ठेवलं जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!

“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; वाचा ताजे दर

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”

“The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More