नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. युक्रेनवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमधील काही भागांवर नव्याने हल्ला करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत.
युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना या युद्धाचा फटका रशियालाही बसू शकतो. रशियात लष्करी उठाव होण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेच्या माजी जनरलकडून करण्यात आला आहे.
पुतिन सत्तेवरून हटले तर त्यांची हत्या होऊ शकते, असा धक्कादायक दावा अमेरिकेचे माजी जनरल जॅक केन यांनी केला आहे. पुतिन यांच्या युद्धाच्या कमकुवत हाताळणीमुळे वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी व सुरक्षा सेवेतील लोक निराश असून आगामी काळात हा असंतोष अधिक भडकू शकतो.
दरम्यान, पुतिन सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकतात. पुतिन कुठेही जाणार नाहीत हे सत्य आपण स्विकारलं पाहिजे. कारण पुतिन यांना माहिती आहे दुसरं कोणी सत्तेत आलं तर ते जिवंत राहणार नाहीत, असंही जॅक केन म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार ‘या’ भाजप नेत्याची भेट
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर
Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘जबरदस्तीने ओरल सेक्स करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्यावर एक्स वाईफचा गंभीर आरोप
दिलासा मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्यांच्या अडचणी कायम!
Comments are closed.