‘बाप’रे! 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार; युद्धजन्य परिस्थितीत गर्लफ्रेंड प्रेग्नेंट
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. आज रशियात सगळीकडे विक्टरी डे परेडची धामधूम असताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) वयाच्या 70व्या पुन्हा एकदा बाप होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
व्लादिमीर पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना काबाएवा (Alina Kabaeva) गरोदर असल्याचं पाहून पुतिन थक्क झाले. आजच्या विक्टरी डे परेडमध्ये आपल्या युद्ध मशीन दाखवण्याच्या तयारीत असलेल्या पुतिन यांना अचानक ही बातमी समजल्याने ते भडकले असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.
‘जनरल एसव्हीआर टेलिग्राम’ या रशियन न्यूज चॅनेलने अलिना काबाएवा गरोदर असल्याचा दावा केला आहे. रशियाची सर्वात लवचिक महिला म्हणून देखील अलिनाची ओळख आहे.
दरम्यान, पुतिन यांना अलिनासह दोन मुलगे असल्याचं म्हटलं जात आहे. अलिनाला 2015 साली एक मुलगा झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अलिनाला मॉस्को येथे आणखी एक मुलगा झाला असल्याची माहिती रशियातील एका स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे. तर पुतिन यांनी कधीच अलिना सोबतचे संबंध कबूल केलेले नाहीत.
थोडक्यात बातम्या-
‘माझा संशयास्पद मृत्यू झाला तर…’; स्वत:च्याच मृत्यूबाबत Elon Musk यांचं खळबळजनक ट्विट
एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…
पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?
कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Comments are closed.