बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुतीन यांनी तालिबान सरकारला खडसावलं, म्हणाले…

नवी दिल्ली | तालिबान सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापन झालं आहे. तालिबान दहशतवाद्यांनी काबुल या अफगाणिस्तानच्या राजधानीमधून आपली सत्ता हाकायला सुरूवात केली आहे. आता तालिबानसमोर देशातील व्यवस्था चालवण्याचा प्रश्न आहे. चीन सरकारने नुकतीच तालिबानला सरकार चालवण्यासाठी 310 डाॅलरची मदत केली आहे.

जगातील विविध देश तालिबानबाबत आपली भूमिका आता स्पष्ट करत आहेत. सध्या भारताच्या नेतृत्वात ब्रिक्स संघटनेची बैठक चालू आहे. या बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तालिबानला सुचक इशारा दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या शेजारी राष्ट्रांना त्रास देण्याचं काम करता कामा नये, असं पुतीन म्हणाले आहेत.

अफगाणिस्तानच्या शेजारील देशांच्या अंतर्गत विषयांवर तालिबानने आपली मतं मांडू नयेत. तसेच शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी कार्यवाही करू नये. अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गोष्टींचा धोका अफगाणिस्तानने निर्माण करता कामा नये. या शब्दात पुतीन यांनी तालिबान सरकारला खडसावलं आहे.

ब्रिक्स संघटनेच्या बैठकीत पुतीन यांनी तालिबानबाबत आपली मतं मांडली आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर आमचं लक्ष असल्याचं पुतीन यावेळी म्हणाले आहेत. चीन आणि पाकिस्तान तालिबानला मदत करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

गर्भवती महिलेला तराफ्यावरून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात, वाचा थरारक प्रवास

“मोदी देश विकायला निघालेत, त्यामुळे 2024 हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं “

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका!

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरील लूकआऊट नोटीसवर गृहमंत्री म्हणाले…

‘महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं, त्या कधीही…’; तालिबानी प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More