मॉस्को | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कावाईचे आदेश दिल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र झालं. रशियाच्या या घोषणेनंतर अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. या कारवाईवर रशियाने पलटवार केला आहे.
OFAC ने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडावर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले आहेत. शिवाय, अमेरिकेने रशियन सेंट्रल बँकेसह यूएस डॉलर वयवहार पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचे आणि रशियन थेट गुंतवणूक निधी पूर्णपणे गोठवण्याचा निर्णय घेतला.
अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियाची कोंडी केल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर कारवाई करत विशेष आर्थिक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी अमेरिका व त्याच्याशी संबंधित देशावर कारवाई केली असल्याचं स्पुतनिकने क्रेमलिन प्रेसचा हवाला देत सांगितलं आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये रशियन लष्करी दलांनी केलेल्या अनावश्यक हल्ल्यामुळे उद्धवलेल्या सुरक्षा समस्यांमुळे आम्ही ही पावले उचलली असल्याचं परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेने लादलेल्या प्रतिबंधावर पलटवार करत रशियाने विशेष आर्थिक निर्बंधांचे निर्देश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत”
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पंढरपुरात महावितरणला साप भेट
“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत
राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ नेत्याची 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त
Comments are closed.