मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस परिस्थीती भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्ण पणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कोरोना संकटाचा सामना करु, असं आवाहन भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केलं आहे.
राज्यात करोनाचं संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे, असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हटलंय.
शासकीय रुग्णालयांच्या बेड्सच्या संख्येची मर्यादा आहे. खूप मोठ्या संख्येनी रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे या परिस्थितीचा सामना करणं शक्य होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे सरसकट संशयाच्या नजरेने पाहणं चुकीचं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच सर्व नागरिकांनी शासनाने घालुन दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण
….तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, रियाच्या वकिलांची माहिती
जपानमध्ये घरपोच जेवणाची ऑर्डर पोहोचवतोय बॉडी बिल्डर; जाणून घ्या यामागील कारण…
मोदींच्या ‘मन की बात’मधून प्रेरणा घेऊन युवकाने मातीची खेळणी बनवण्याचं ठरवलं!
कोरोना संकटातही अमेरिकेतील बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांनी घसरला…!