स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?

PV Sindhu to get married this month

PV Sindhu | भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाचं नाव उज्वल करणारी सिंधू लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पी व्ही सिंधू आता आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणार आहे. दोनदा ऑलिंपिक मेडल जिंकणारी सिंधू हिने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांशी शेअर केलीये. (PV Sindhu)

यानंतर सिंधूचा होणारा नवरा कोण, तो काय करतो?तसेच ती लग्न बंधनात नेमकं कधी अडकणार, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सिंधू याच महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. हैदराबाद मधील एका बिझनेस एक्झिक्यूटिव्ह ती लग्नगाठ बांधणार आहे.

येत्या 22 डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा पार पडणार असून त्यानंतर भव्य रिसेप्शनचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या रविवारी सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकणाऱ्या पी व्ही सिंधूने डबल सेलिब्रेशन करण्याची ही संधी दिली आहे. पी व्ही सिंधू ही व्यंकट दत्ता यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. राजस्थान मधील लेक सिटी मध्ये येत्या 22 डिसेंबरला हा लग्न सोहळा होईल. तर 20 डिसेंबर पासून लग्नापूर्वीच्या सर्व विधी सुरू होतील. (PV Sindhu)

पी.व्ही.सिंधूचा होणारा पती कोण?

पी व्ही सिंधू हिच्या होणाऱ्या पती बद्दल बोलायचं झाल्यास, व्यंकट दत्ता हे पॉसिडेक्स टेक्नॉलॉजी मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ते फक्त टेक्नॉलॉजी कंपनीशी जोडलेले नसून जगातील सर्वात प्रसिद्ध टी-ट्वेंटी स्पर्धा आयपीएलशी देखील त्यांचं जवळचं नातं होतं. ते आयपीएल फ्रॅंचाईजीचे व्यवस्थापन करत होते. (PV Sindhu)

तर पी व्ही सिंधू बद्दल सांगायचं झाल्यास देशासाठी इतकी वर्ष बॅडमिंटनमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या सिंधूने आता आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केलीये. गेल्या काही काळापासून ती आपल्या खराब परफॉर्मन्सशी सामना करत होती. बरेच दिवस तिला कोणतेही मोठे यश देखील मिळाले नाही.या पॅरिस ऑलिंपिक मध्येही सिंधूची म्हणावी तशी कामगिरी दिसून आली नाही.

‘या’ दिवशी पी.व्ही.सिंधू अडकणार लग्न बंधनात

लागोपाठ दोन ऑलिंपिक मध्ये रौप्य आणि कांस्यपद जिंकणारी सिंधू यावेळेस पहिल्यांदाच रिकाम्या हाताने परतली. इतकंच नाही तर तिला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत देखील विजेतेपद पटकावता आलं नाही. तिच्या फिटनेसचा प्रश्नही मागे चर्चेत होता. मात्र आता या 1 डिसेंबर रोजी सिंधूने प्रतिष्ठित सय्यद मोदी स्पर्धा जिंकून पुन्हा कमबॅक केले. यानंतर पी व्ही सिंधू आता आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. या 22 डिसेंबर रोजी पी व्ही सिंधूचा  विवाह सोहळा पार पडणार आहे. (PV Sindhu)

News Title –  PV Sindhu to get married this month

महत्त्वाच्या बातम्या

कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…

लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, संभाव्य नावे समोर

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .