नवी दिल्ली | बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पी. व्ही सिंधू हिनं मी निवृत्त होतेय, अशी पोस्ट टाकत सर्वांनाच धक्का दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून मनात उठणाऱ्या वादळाबद्दल विचार करत होते. त्यासोबत तोडगा काढताना संघर्ष होतो. पण आज माझ्या मनातील भावना मी इथं लिहून, बसं झालं ते सांगत आहे. कदाचीत ही पोस्ट अखेरपर्यंत वाचल्यानंतर तुम्ही माझ्या समर्थनार्थ असाल अशी आशा आहे, असं सिंधूनं म्हटलंय.
आपल्याला हार माणून चालणार नाही. सध्यापेक्षा चांगली तयारी करण्याची गरज आहे. सर्वजण मिळून या विषाणूचा पराभव करुयात. सध्या आपण देत असेला लढा पुढच्या पिढीचं भविष्य ठरवेल, असं सिंधू म्हणाली आहे.
सध्या परिस्थितीत असलेल्या अशांतीच्या भावनेतून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी या नकारात्मकता, सततचं भय आणि अनिश्चितत्तेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं पी. व्ही. सिंधू यांनी म्हटलं.
— Pvsindhu (@Pvsindhu1) November 2, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम
“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”
‘… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल’; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा
एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा; अतुल भातखळकर यांची मागणी
“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिराग पासवान यांचं वर्तन संशयास्पद”