बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

मुंबई | आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडणार असून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र सुरूवातीलाच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं.

सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात आक्षेप व्यक्त केला.

सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, आयोग काय करतंय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More