Top News महाराष्ट्र मुंबई

भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?

मुंबई | रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. मात्र आता भाजप नेते कृष्णा हेगडे तसेच मनसेचे मनिष धुरी यांच्या खुलास्यांमुळे त्यांना राजकीय जीवदान मिळाल्याचं मानलं जात आहे.

रेणू शर्मा यांनी आपल्यालाही त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी केला आहे. त्यानंतर जेट एअरवेजचे कर्मचारी रिझवान कुरेशी यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेली तक्रार पुढे आल्यानंतर हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

दरम्यान, या प्रकरणात रेणू शर्मा बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते धनंजय मुंडे यांनी पाठराखण करत असल्याची माहिती असून त्यांचा राजीनामा घेऊ नये यासाठी दबाव आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आरोप झाले म्हणून मी कुणाचाही राजीनामा घेणार नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजकीय जीवदान मिळाल्याचं मानलं जातंय.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तरी त्यांच्यावर कारवाईची तलवार टांगतीच आहे, कारण निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी चुकीची माहिती दिल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनात येतंय. निवडणूक आयोगानं याप्रकरणी दखल घेतली तर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांची आमदारकी जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या संतोष धुरींनी दिली धक्कादायक माहिती

प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे

नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार

कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या