ज्ञानेश्वर साळवेचं मंत्रालयातील आंदोलन उत्स्फुर्त की पूर्वनियोजित?

मुंबई | मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून आंदोलन करणारा उस्मानाबादचा ज्ञानेश्वर साळवे संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. आदोलनापूर्वी त्यानं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना तसेच वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना फोन केल्याचं कळतंय. 

मंत्र्यांनी व्यथा ऐकण्यासाठी वेळ न दिल्यानं त्यानं हे आंदोलन केल्याचं सांगितलं जातंय. मात्र आंदोलनापूर्वी 3 दिवस आधीच तो मंत्रालयात येत होता. 

प्रत्यक्षात आंदोलनापूर्वी त्याने धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांना फोन केले होते. तसेच आंदोलनाच्या आदल्या रात्री नरिमनच्या आयनॉक्स थिएटरमध्ये सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमाही पाहिल्याचं कळतंय. त्यामुळे ज्ञानेश्वरच आंदोलन उत्स्फुर्त होतं की पूर्वनियोजित?, असा प्रश्न आता विचारला जातोय.