‘लोक ज्या गोष्टींना कवटाळून बसतात, त्या…’; निवृत्तीनंतर अश्विन स्पष्टच बोलला

R Ashwin A Lesson in Fearlessness

R Ashwin | प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन ( R Ashwin) याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या कारकिर्दीविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. अश्विन आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचला, पण त्याने हे यश सहजासहजी मिळवलेले नाही.

तो अपयशाला कधीही घाबरला नाही आणि अपयशातून शिकत तो इथपर्यंत पोहोचला आहे. अश्विनच्या मते, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जोखीम पत्करावीच लागते आणि अपयशाची भीती सोडून द्यावी लागते.

अश्विनने आपल्या एका मुलाखतीत जीवनातील काही महत्त्वाचे धडे सांगितले आहेत. तो म्हणतो, “कसिनोमध्ये जाऊन तुम्ही तिथे पैसे जिंकण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कदाचित सगळे पैसे गमावून बसाल. पण जर तुम्ही तिथे फक्त मजा करण्यासाठी गेलात आणि पैसे गमावण्याची तयारी ठेवली, तर तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कारण, तुम्ही तिथे कसलीही भीती न बाळगता खेळता.” आयुष्याचेही असेच आहे, असे अश्विनला वाटते. घाबरून न जाता, निर्भयपणे आणि आव्हानांना सामोरे जात आयुष्य जगायला हवे.

टीकाकारांना मानतो गुरू

अश्विन ( R Ashwin) पुढे म्हणतो, “मला आयपीएलच्या एका सामन्यातून बाहेर बसवण्यात आले होते. ज्यांनी मला बाहेर बसवले, त्यांच्याविषयी मनात राग धरून बसलो असतो, तर माझ्यातली जिद्द कशी वाढली असती? म्हणून, जे लोक तुम्हाला आयुष्यात कटू अनुभव देतात, त्यांना मी गुरू मानतो. मला आयुष्यात कधीच असुरक्षित वाटले नाही, कारण आज माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या कदाचित उद्या नसतील, हे मी स्वीकारले आहे. त्यामुळे लोक ज्या गोष्टींना कवटाळून बसतात, त्या मी सोडून दिल्या आहेत.”

“मला अतिविचार करणारा म्हणून ओळखले जाते, पण दडपणाखाली खेळण्यात एक वेगळीच मजा असते. पुढे जायचे असेल तर जोखीम घ्यायला घाबरू नका,” असा मोलाचा सल्ला अश्विन देतो.

संघर्ष घडवतो माणूस

आयुष्यात दररोज काहीतरी नवीन शिकायला हवे, असे अश्विनचे मत आहे. “तुमचे भविष्य तुमचा संघर्ष घडवत असतो, हे मी शिकलो,” असे अश्विन आवर्जून सांगतो. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक आव्हानाला संधी समजून, न डगमगता सामोरे जाण्याचा संदेश अश्विनच्या कारकिर्दीतून मिळतो.

Title : R Ashwin A Lesson in Fearlessness

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .