चेन्नई | भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 578 धावा केल्या. पहिल्या दोन दिवसात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या खेऴाडूंना बाद करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अश्विन आणि बुमराने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव आटोपला.
भारतीय गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी 3 विकेट्स मिळाल्या. शहबाज नदीम आणि इशांत शर्मा ला प्रत्येकी 2 विकेट्स घेण्यात यश आले.
भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी, एक चांगली गोष्ट सामन्यात घडली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 55.1 ओवर मध्ये 146 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने जेम्स अँडरसनला बाद करताच एक विक्रम आपल्या नावावर केला.
अश्विन आशियात 300 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या आधी आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा बहुमान भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचा नावावर आहे. त्याने 82 कसोटींमध्ये 419 विकेट्स घेतल्या आहे.
थोडक्यात बातम्या-
हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा
“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”
शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी
घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत
साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!