बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसोटी विश्वचषकात ‘या’ भारतीय गोलंदाजाने मिळवले सर्वाधिक बळी, फलंदाजीत टॉप 3 मध्ये एकही भारतीय नाही

मुंबई | भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आहे. कर्णधार केन विल्यमन्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या कसोटी विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने सर्वाधिक बळी घेतले आहेत. त्याने 14 सामन्यांमध्ये 71 मिळवले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने 70 बळी त्यानंतर इंग्लंडचा स्टुअर्ड ब्रॉडने 69 बळी घेतले आहेत. त्यानंतर न्यूझीलंडच्या टीम साऊथीने 56 बळी तर ऑस्ट्रेलियाचा फीरकीपटू नॅथन लियॉननेही 56 बळी घेतले आहेत.

सर्वाधिक बळींनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने प्रथम क्रमांक मिळवला आहे. 13 सामन्यात त्याने 1675 च्या धावा केल्या आहेत. त्यानंतर इंग्लंडच्या ज्यो रूटने 1660 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीनवन स्टीवन स्मिथने 1341 धावा केल्या आहेत.  चौथ्या स्थानी बेन स्टोक्स असून त्याने 17 सामन्यात 1334 धावा ठोकल्या आहेत. तर पाचव्या स्थानी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 1174 धावा केल्या आहेत.

भारताकडे एका पेक्षा एक फलंदाज आहे मात्र तरीही सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये एकाच खेळाडूचा समावेश आहे. अंतिम सामन्यात भारताने खराब प्रदर्शन केल्याने पराभव पत्कारावा लागला आहे. भारताची फलंदाजी दुसऱ्या डावातही पुर्णपणे ढेपाळली. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल पाचव्याच दिवशी बाद झाले होते. सहाव्या दिवशी खेळताना विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. यष्टीरक्षक रिषभ पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार मारले. मात्र त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि मोठी भागीदारीही झाली नाही.

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीयांना न्यूझीलंडची सलामीची जोडी लवकर फुटली नाही. मात्र आर. आश्विवनने दोन गडी बाद करत संघाला पुनरागमनाची आशा जिवंत केली. मात्र टेलर आणि केनने यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.

थोडक्यात बातम्या- 

रिलायन्सच्या 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लसीकरण!

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More