बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलमधील या संघाला मोठा धक्का! या भारतीय खेळाडूने घेतला स्पर्धा सोडण्याचा निर्णय

मुंबई | आयपीएलमध्ये प्रत्येक संघाने आता विजयाचं खात उघडलं आहे. आता गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये येण्यासाठी प्रत्येक संघ सांघिक खेळ करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. यंदाच्या हंगामात अंतिम चारमध्ये येण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र अशातच भारताचा फिरकीपटू आणि आणि आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघातील आर. अश्विनने स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासोबत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईल, असं आर. अश्विनने म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण आश्विन अनुभवी फीरकीपटू आहे. त्यासोबतच फलंदाजीही काही प्रमाणात करू शकतो. मात्र त्याला कोरोनामुळे आयपीएल सोडावी लागत आहे. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.

दरम्यान, आश्विनने आयपीएच्या 14 व्या पर्वात दिल्लीसाठी 5 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ 1 विकेट घेतली आहे. स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा अश्विन हा एकमेव खेळाडू आहे. त्याला चमकदार कामगिरी जरी करता आली नसली तरी तो संघात असणं महत्त्वाचं आहे.  आश्विन एक विकेट टेकर फीरकीपटू आहे. आत्ताच त्याने भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई?; मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More