आरजे मलिष्काला आता अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीस

मुंबई | मुंबई महापालिकेवर विडंबन नाट्य केल्यानंतर आरजे मलिष्कावर सूड उगवण्याच्या हालचाली सुरु असल्याचं दिसतंय. पालिका अधिकाऱ्यांना तिच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्यानंतर तिला आता अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस पाठवली जाणार आहे. 

मलिष्काने आपल्या घरी अनधिकृत बांधकाम केल्याचंही पालिकेच्या निदर्शनास आलं असून त्याबद्दलही नोटीस पाठवली जाणार आहे, असं शिवसेनेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितलं. ते स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या