Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रतन टाटांच्या बायोपिकमध्ये आर माधवन करणार काम?; माधवन म्हणाला…

मुंबई  | टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या  बोयोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेता आर. माधव काम करणार असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे.

आर. माधवन आणि रतन टाटा यादोघांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे. आर. माधवन या बायोपिकमध्ये रतन टाटा यांची भूमिका साकारणार असल्याचाही दावा केला जात आहे.  यावर आर. माधवने एक ट्विट करुन याबद्दल खुलासा केला आहे.

माधवन म्हणाला की, “दुर्दैवाने हे खरे नाही. माझ्या काही चाहत्यांची ही इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी हे पोस्टर बनवले. असा कोणताही प्रोजेक्ट नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही चर्चाही नाही”.

दरम्यान, आर. माधवनच्या या स्पष्टीकरणामुळे आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. मात्र, बायोपिकमध्ये रतन टाट यांची भूमिका कोण साकारणार हे पाहण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

“विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला”

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

‘ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार’; फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या