पाटणा | बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी एका निवडणूक प्रचार सभेत जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही असं म्हटलं आहे. यावरून लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी मोदींना टोला लगावलाय.
सुशील मोदी यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे ट्विट रिट्विट करत राबडी देवी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
लो कर लो बात. 15 वर्षांपासून काय मटार सोलत होतात काय?, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना 15 वर्षांनंतर समजलं आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल, असं राबडी देवी यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
‘पुन्हा असं होणार नाही’ म्हणत भाजपवासी झालेल्या खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी!
रशियाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लसीला मंजुरी
अतिवृष्टीमुळे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द!
मास्क न घालणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, मुंबईतील पहिलीच घटना