संसदेत राडा; शिवरायांबद्दल बोलताना कोल्हेंचा माईक केला बंद

नवी दिल्ली | संसदेचे हिवाळी अधिवेशन(Winter Session) बुधवारपासून सुरू झालं आहे. गुरूवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यावेळी खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोल्हेंसोबत संसदेत भलताच प्रकार घडल्याचं दिसून आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपकडून(BJP) अवमानकारक वक्तव्य केल्यानं, त्या संदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी कोल्हे उभे राहिले असता मधूनच त्यांचा माईक बंद करण्यात आला.

छत्रपती देव नाहीत, पण देवापेक्षा कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्ते वक्तव्य करण्याची कोणाची हिंमत होता कामा नये,असं कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल हे ‘हो गया हो गया म्हणाले’ आणि त्यांनी कोल्हेंचा माईक बंद करण्यास सांगितला. त्यानंतर काही सेकंदातच कोल्हेंच्या समोरील माईक बंद झाला.

संसदेत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकराबद्दल कोल्हेंनी संताप व्यक्त केला आहे. मी जो विषय मांडणार होतो, त्या विषयासाठी शून्य प्रहारामध्ये वेळ दिला होता. परंतु वेळ देऊनही मला बोलून दिले नाही, माझा आवाज दाबण्यात आला, असं म्हणत त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

मी बोलणं सुरू केल्यावर केवळ दोन-तीन वाक्यानंतरच माईक बंद करण्याची सूचना देण्यात आली. माझा आवाज दाबला, पण शिवभक्तांच्या आवाजानं तुमच्या कानठाळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत,असा इशाराही कोल्हेंनी दिला आहे.

दरम्यान, अमोल कोल्हेंसोबत झालेल्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-