बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंना शिवीगाळ करत, मराठा आरक्षण बैठकीत शिवसैनिकांचा राडा!

औरंगबाद | सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळताना दिसत आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलनासाठी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती आंदोलनाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातून झाली. त्यानंतर शिवसंग्राम सारख्या मराठा संघटनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेना आणि शिवसंग्राम यांच्यातील वाद पुन्हा उफळताना दिसत आहे.

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्यावतीने गुरुवारी आयोजित बैठकीत करण्यात आली होती. त्याावेळी काही शिवसैनिकांनी बैठकीत राडा घातला. त्यावेळी  शिवसैनिकांनी संयोजकांनाच मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. तर आमदार विनायक मेटे यांनाही शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेना आणि शिवसंग्राम आमने- सामने आल्याचं चित्र आहे.

सरकारच्या गुंडांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी विनायक मेटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मेटेंनी त्यांना शांत राहण्यास सांगितलं. मात्र शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. यावेळी डॉ. अभिमन्यू माकणे यांनी त्यांना हॉलमधून बाहेर जाण्यास सांगतल्यानं त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलची, सचिन घनवट यांच्यासह पाच ते सहा जणांनी बैठकीत राडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कायदेशीर पद्धतीने पुढील कारवाई करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण…”

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

‘…तर कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची गरज नाही’; ICMR च्या रिसर्चमधून महत्वाची माहिती समोर

पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ; किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर…’; आरक्षणावरून नणंद-भावजय आमनेसामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More