मुंबई | आरजे मलिष्काने बनवलेल्या नव्या गाण्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी तिला सल्ला दिला आहे. त्यासोबत शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिनं काय चुकीचं केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मलिष्काला एकदा पूर्ण महाराष्ट्र फिरवून आणला पाहिजे. मग तिच्या गाण्यात थोडी सुधारणा करेल. ‘गेली गेली मुंबई खड्ड्यात..’ एेवजी ‘गेला गेला महाराष्ट्र खड्ड्यात…’, असा सल्ला विखे-पाटलांनी दिला आहे.
दरम्यान, मलिष्काला असलेल्या धोक्याचा अंदाज घ्या आणि आवश्यक असल्यास सुरक्षा द्या, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल
-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा