पुणे | भाजपनं ईडीची भिती दाखवल्यानं शिवसेना युतीसाठी तयार झाली अशी माहिती माझ्याकडं आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
दुष्काळातील शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय युती करणार नाही, असं शिवसेना म्हणाली होती त्याचं काय झालं? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे.
राज्यातला शेतकरी वाऱ्यावर आहे, राम मंदिरही झालेलं नाही, असं असताना उद्धव ठाकरे युतीसाठी तयार झाले आता त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं उत्तर द्यावं, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर शिवसेनेनं पातळी सोडून केलेली टीका भाजप विसरलं का?, असा सवाल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची पहिली प्रचारसभा नांदेडमध्ये होणार
–मसूद अझहरची सुटका कोणी केली होती?; सिद्धूंचा भाजपला सवाल
–मोहालीनंतर सवाई मानसिंग स्टेडियममधूनही हटवले पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो
–माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येचं ‘गुढ’ उकललं
–“मोदीजी नागरिकांनी दिलेला पैसा जवानांच्या कुटुंबाला देऊन टाका”
Comments are closed.