विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई |  विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. विखे पाटील यांच्या बहिणीचे पती निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

काही दिवसांपूर्वी विखे पाटलांचे पुत्र सुजय यांनी आई-वडील काँग्रेसमध्ये असले म्हणून मी सुद्धा त्याच पक्षात असावं, असं काही नाही, असं म्हटलं होतं.

आता झेंडे यांनीही निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडल्याने विखे पाटलांच्या राजकीय संघर्षात भर पडणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादीच्या मंचावर झेंडे यांचा राजकारणात प्रवेश होईल.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”