बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठवड्यापूर्वीच कोरोनावर मात केलेले ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं दुःखद निधन

मुंबई | मागच्या आठवड्यातच कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतलेले ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन ते घरी परतले होते, त्यानंतर अचानक काल रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, कूपर रुग्णालयात उपचारादरम्यान राधाकृष्ण नार्वेकर यांचं आज सकाळी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण नार्वेकर यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. राधाकृष्ण नार्वेकर ज्येष्ठ पत्रकार तसेच मुंबई सकाळचे माजी संपादक होते.

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते तसेच राज्यपाल यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेलं राधाकृष्ण नार्वेकर हे नाव आता ऐकायला मिळणार नसलं तरी ही ते आपल्या लेखणीमुळे आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडल्यामुळे लोकांच्या मनात कायम राहतील.

राधाकृष्ण नार्वेकर यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच सुरुवातीला शिक्षक म्हणून काम करत असलेले नार्वेकर काही काळानंतर पत्रकारितेत सक्रिय झाले आणि त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. राधाकृष्ण नार्वेकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारिता क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

अँजिओप्लास्टीसोबत शुगर-बीपी, खासगी रुग्णालयाने हात झटकले, मात्र सरकारी रुग्णालयाने आजीला वाचवले!

धक्कादायक! संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा अन्…

WHOने भारतात सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरियंटला दिली ‘ही’ नावे

शेवटी बाप तो बापच पोराच्या जीवासाठी तब्बल 300 किमीचा सायकलवर प्रवास; डाॅक्टर म्हणाले होते…

“ज्या देशात रनौत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More