100 रुपयांच्या स्टँम्प पेपरला मुख्यमंत्र्यांचं हजार रुपयांचं उत्तर

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेत. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री म्हणतात 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मुख्यमंत्र्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे लिहून द्यावं, अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

शंभर नव्हे 1 हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, जे सांगू ते खरं सांगू, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.