मुंबई | विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी होऊन मंत्री झाल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सध्या जोरदार टीका सुरु आहे. मात्र याची सुरुवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
१९८५ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यावेळी शरद पवारांकडे विरोधी पक्षनेता पद होतं.
दोन वर्षांनी म्हणजेच १९८७ साली शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं आणि त्यानंतर ते थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
राधाकृष्ण विखे यांच्याआधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधी पक्षनेता ते थेट मंत्री असा प्रवास केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीतून घेतली शपथ
-अजित पवारांचा मिश्किल अंदाज; म्हणाले आमचा तिसरा विरोधी पक्षनेता तरी पळवू नका
-शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडूंच शोले स्टाईल आंदोलन; चढले साखर संकुलावर
Comments are closed.