बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार आपल्या परीने प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे मात्र काही ठिकाणी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड्यावर पडत आहे. याच पार्श्वभमूीवर भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थेच्यावतीने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

सरकारमधील लोकांची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. या संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाहीत, औषधे जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

कोरोना संबंधी महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहिलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा दिली खरी, मात्र प्रत्यक्षात सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान,काही खासगी रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडले जात आहे. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने मोठे अर्थिक संकट निर्माण झालं असल्याचं विखे पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! कोरोनावर आणखी एका औषधाला मंजुरी, ऑक्सिजनची गरज होणार कमी

‘स्वामी…स्वामी..स्वामी…’म्हणत अंकिता लोखंडेने घेतली कोरोनाची लस, व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतात लसीचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी?, परराष्ट्र मंत्री म्हणाले…

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More