बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?”

अहमदनगर | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी राऊत सोमवारी म्हणजे उद्या विवाह बंधनात अडकणार आहेत. पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी एका गाण्यावर ठेका धरला होता. त्यावरून आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. लग्नात तुम्ही नृत्य करता, एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत, अशी घणाघाती टीका विखे पाटलांनी केली आहे.

तसेच यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करताना महाविकास आघाडी सरकारला खोचक सवाल केले आहेत. ‘वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावं अंधारात जात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं.  त्यातच आता संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह असल्याने रेनेसाँ या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमावेळी दोन्ही दिग्गज नेत्यांनी गाण्यावर ठेका धरला होता. हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून चक्क धरणातून सोडले पाणी, अधिकाऱ्यांचा प्रताप उघड

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चढउतार सुरूच, वाचा आकडेवारी

ओमिक्राॅन कोरोना व्हेरिएंटबाबत केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी

भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदूंशिवाय भारत नाही – सरसंघचालक मोहन भागवत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More