आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल-राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने 10 लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्याला मंत्र्यांच्याच दालनात मारहाण करण्यात आली होती. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. ही या सरकारच्या कर्माची फळे असतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, भ्रष्टाचाराबाबत सरकारलाच गांभीर्य राहिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगणेच गैर असून, हे प्रकरण सुद्धा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांना झेड प्लससारखी सुरक्षा द्या; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-शाळांमध्ये भाजप जबरदस्तीने पक्ष प्रचार करत आहे; नवाब मलिक यांचा आरोप

-ऊसाचे पीक घेऊ नका, मधुमेह होईल; योगींचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

-पंतप्रधान कार्यालयाला कर्ज बुडव्यांची यादी पाठवली होती; रघुराम राजन यांचा खुलासा

-स्वत: मोदी जरी राजू शेट्टी यांच्या विरोधात लढले तरी विजय शेट्टींचाच होणार!