मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर | माझा भाजप प्रवेश हा मुद्दा आता राहिलेला नाही. मी लोकसभेला उघड उघड युतीचा प्रचार केला आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते संगमनेरमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचं समर्थन करत मी माझी वाटचाल सुरु केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी आणि मंत्रिपदी कुणाला संधी हे मुख्यमंत्री ठरवतील, मात्र मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे, असं विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, विखे पाटलांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.

काँग्रेसचा आत्मचिंतन करण्याचा काळ गेला आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

-राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

-सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

-Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

-फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

Google+ Linkedin