Sangamner | संगमनेरमध्ये भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संकल्प मेळाव्यात बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वातावरण तापलं आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. राज्यभरातून सुजय विखे पाटील यांच्यासह वसंतराव देशमुख यांच्यावर टीका केली जात आहे.
वसंतराव देशमुखांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे.
राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा सन्मान करणारं महायुतीचं सरकार आहे.केवळ घोषणा देऊन मतं मिळत नाही. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सरकारने केलंय. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. त्याची प्रचिती आता यायला लागलीय. तिसऱ्यांदा मोदींना लोकांनी पंतप्रधान केलं, असं राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.
उमेदवार कोणताही असो युती म्हणून भूमिका घ्या. दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात?, असा सवाल विखेंनी केलाय.
“चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं?”
हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला
‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान
‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला; ‘हा’ नेता देणार धंगेकरांना टफ फाईट