“नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, कोणी किती महसूल गोळा केला हे येईल समोर”
मुंबई | भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येतंय. राधाकृष्ण विखे पाटील मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर राज्य सडकून टीका केली आहे.
पापाचा घडा भरलेला हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. विखेंनी बाळासाहेब थोरातांचं थेट नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा रोख थोरातांकडेच होता, हे उघड आहे.
दरम्यान, भाजपचा झेंडा हाती घेतल्यापासून विखे पाटील काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तर नगरमध्ये थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता थोरातांचं थेटपणे नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…
“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”
“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू
Comments are closed.