बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार मंगळवारी पार पडला. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटलांनी सर्वप्रथम शपथ घेतली आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे पाटलांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सर्वात प्रथम शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्याही 9 आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, शिंदेंच्या मंत्रिमंडळात वादग्रस्त ठरलेल्या काही नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर पहिल्या टप्प्यात महिला नेत्यांना संधी न दिल्यानेही शिंदे सरकारवर टीका होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी, पुढील 4 तास पाऊस झोडपून काढणार

टीईटी घोटाळा प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाविषयी शरद पोंक्षे यांचं मोठं वक्तव्य!

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं; भाजपकडून 4 ते शिंदे गटाकडून 4 आमदारांना फोन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी जिंकलं गोल्ड मडल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More