Radhakrishna Vikhe Patil - ...मग आता मुख्यमंत्र्यांनाही रामाचा अवतार जाहीर करून टाका!
- औरंगाबाद, महाराष्ट्र

…मग आता मुख्यमंत्र्यांनाही रामाचा अवतार जाहीर करून टाका!

जालना | पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार भाजपने जाहीर केलंच आहे. आता देवेंद्र फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करून टाका, म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल, असा असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

जालना येथील जनसंघर्ष यात्रेच्या जाहीरसभेत बोलताना विखे-पाटलांनी ही टीका केली आहे.

हे सरकार 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार होतं. पण जनसंघर्ष यात्रेला घाबरून आधीच दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. शेतकऱ्यांना कोणत्याही सवलती देण्यास सरकार तयार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, माणसं मरत असताना राज्य सरकार उत्सव साजरं करणार आहे, अला टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही- चंद्रकांत पाटील

-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; दुरदर्शनच्या कॅमेरामनसह तीन जण ठार

-नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे

-मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित!

-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा