Loading...

“किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?”

संगमनेर | लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल लक्षात आलाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत 220 जागांचं उद्दिष्ट साध्य करताना संगमनेरने मागे राहू नये. किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?, असा प्रश्न विचारत राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

तालुक्याच्या विकासात संगमनेरच्या बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. मात्र हे सगळं आमच्यामुळंचं घडतं, असा काहींचा गैरसमज आहे. तो दूर करण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. ते संगमनेर व्यापारी असोसिएशनकडून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Loading...

राज्यात 220 चा आकडा पार करण्यासाठी नगर जिल्ह्यात आम्ही 12 विरूद्ध शून्यच्या तयारीला लागलोय, असंही विखेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, देश बदलला, राज्य बदलंल, आता संगमनेर तालुक्यातही बदल व्हायला हवा, असंही विखे यावेळी म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

-…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

Loading...

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

Loading...