Loading...

शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

नाशिक | राज्यात गंभीर पूरस्थिती असताना भाजप सरकार चांगलं काम करतंय. पण काहीजण आम्हीच ज्ञानी आहोत, अशा अविर्भावात काम करत असतात, असा टोला राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

सगळीकडून पूरग्रस्तांसाठी मदत येतेय. मात्र जी मदत येतेय ती योग्यरितीने पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेली नाही, अशी टीका शरद पवारांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेताना सरकारवर केली होती. याच टीकेला विखे-पाटलांनी उत्तर दिलं आहे.

Loading...

महापुरात शेती, पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. अशात सरकार योग्य काम करत नाही, असं सांगून विरोधी पक्षातले नेते आपणच खूप ज्ञानी असल्यासारखं वागत आहेत. पण त्यामध्ये काही विशेष नाही, विरोधी पक्षांचं ते कामच असतं. मी पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं आहे, असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, सांगली-कोल्हापूरातली स्थिती हळूहळू पूर्ववत होतेय. मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

-पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

Loading...

-“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

-“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

Loading...