पुणे महाराष्ट्र

बाहेरील नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांनी रोहित पवारांना सुनावलं

अहमदनगर | आगामी निवडणुकीत कोणाला कुठं उभं रहायचंय ही ज्याची त्याची इच्छा आहे. परंतू जिल्ह्यात सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे बाहेरचं नेतृत्व नगरकर स्विकारणार नाहीत, असं राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातले संभाव्य उमेदवार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांच्या उमेदवारीवर मतदारसंघात बऱ्याच उलट-सुलट चर्चा होत आहेत. मात्र आपण निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याचं रोहित पवार वेळोवेळी अधोरेखित करताना दिसत आहेत.

कुकडी योजनेतून उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी साकळाईसाठी देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यानी दिला आहे, असं म्हणत विखे-पाटील या कामात कोणतीही अडचण येणार नसल्याचा शब्द नगरवासियांना दिला आहे. ते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, मागच्या बऱ्याच दिवसांपासून जिल्हा विभाजनाची मागणी आहे. त्याला विरोध नाही मात्र सध्या लोकांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो”

-आमच्या हातात सत्ता द्या… स्थानिकांना 75 टक्के रोजगार देतो- अजित पवार

-दोषी नसाल तर घाबरू नका… चौकशीला बिनधास्त सामोरे जा; तावडेंचा राज यांना सल्ला

-राज ठाकरे यांना ईडीची नोटीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदार कार्यकर्त्यांसह राज यांच्या भेटीला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.