Loading...

“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

अहमदनगर | देश बदलला, राज्य बदलंल, आता संगमनेर तालुक्यातही बदल व्हायला हवा. राज्यात 220 चा आकडा पार करण्यासाठी नगर जिल्ह्यात आम्ही 12 विरूद्ध शून्यच्या तयारीला लागलोय, असं राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपमधलं इनकमिंग हाऊसफूल झालं असलं तरी मोठा जनाधार असलेले नेते भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. सरकार अतिशय चांगलं काम करतंय. जनतेचा सरकारवर विश्वास आहे. याची प्रचिती येत्या काळात येईलच, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. ते संगमनेर व्यापारी असोसिएशनकडून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Loading...

लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल लक्षात आलाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत 220 जागांचं उद्दिष्ट साध्य करताना संगमनेरने मागे राहू नये, असंही ते म्हणाले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने व्यापारी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री नगरमध्ये आल्यावर त्यांच्याशी भेट घडवून आणण्याचंही आश्वासन विखेंनी यावेळी दिलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

Loading...

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

Loading...