अहमदनगर | बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना केलं आहे.
थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर, असा अग्रलेख लिहीत संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला विखे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले, आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील, असा टोला विखेंनी राऊतांना लगावला आहे.
राऊतांचा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच, असा टोमणाही विखेंनी राऊतांना लगावला.
ट्रेंडिंग बातम्या-
आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी
ऑनलाईन वर्ग कसे सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद
महत्वाच्या बातम्या-
अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी
चीनी कंपन्यांसोबतचे करार ठाकरे सरकारने रद्द केले नाहीत तर….; सरकारकडून स्पष्टीकरण
पाकिस्तानी खेळाडूंच्या मानगुटीवर कोरोना, या खेळाडूंना झाली लागण