नाशिक | इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. काँग्रसने लगेच सत्तेबाहेर पडायला हवं होतं पण काँग्रेस नेते सत्तेसाठी लाचार आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पोलीस सहकार्य करत नसल्याच्या प्रश्नावर विखे पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ज्यांनी पोलिसांच्या पक्षपातीपणावरून आरोप केले, तेच आता सत्तेत आहेत. यामुळे आता त्यांचं सरकार काही लपवू पाहतं काय, अशी शंका राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यास राज्य सरकारकडून होणारा विरोध आक्षेपार्ह असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
ट्रेंडिंग बातम्या-
सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल- उर्मिला मातोंडकर
मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप
महत्वाच्या बातम्या-
एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग बाबांना का नाही?; खाशाबा जाधवांच्या मुलाचा सवाल
आपलं पाणी गुजरातला जाऊ देऊ नका; उद्धव ठाकरेंच्या सूचना
अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…
Comments are closed.