महाराष्ट्र मुंबई

बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

मुंबई | बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला असून ते रविवारी सकाळी अकरा वाजता शपथ घेणार आहेत.

उद्या राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची कोणत्या मंत्रिपदी वर्णी लागते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

विखेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. भाजपाध्यक्ष अमित शहांनी देखील तुर्तास विखेंना मंत्री करू नका, असं म्हणत त्यांना वेंटिगवर ठेवलं होतं.

दरम्यान, नव्या मंत्रिमंडळ विस्तारात विखेंना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा!

-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा

-उद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या